
श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र
झनझविला भगव्याच्या समान तुम्ही, जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिवछञपती तुम्ही... !!

श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र
लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार...
"श्री राजा शिवछञपती"
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र.
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||

माहिती
पवार घराणे फार पुर्वीपासून उच्चकुलीन आहे पवार घराण्याला वेदोक्तांचा अधिकार आहे . ब्रम्हेन्द्र स्वामींच्या पञातील उल्लेख पाहता कृष्णाजीराजे पवार विश्वासराव हे जातीने क्षञीय.तुम्हांस सुर्य, गायञी, आणि यज्ञोपायीत आहे .मराठा 96 कुळी याद्या प्रसिद्ध आहेत त्यात ही पवार त्यांचा वंश गोञ गादी निशाण व वेद याची माहिती खालीलप्रमाणे.... कुळाचे नाव पवार, वंश-अग्नीवंश, गादी धारगिरी गादी, निशाण लाल ध्वज त्यावर हनुमान, देवक-धार (शस्ञ), गोञ वशिष्ठ .
धोरण
विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ व विविध समित्यांची स्थापना करून समाज बांधवाना शासकीय व निम शासकीय संस्थाद्वारे योग्य मार्गदर्शन व सुयोग्य मदत मिळवून देवून त्यांच्या शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक प्रगतीस हातभार लावणे.
ध्येय
छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या, धार संस्थानाच्या गादीस प्रमुख समजत महाराष्ट्रांतील तमाम पवार (धार) बंधूना एकत्र आणून त्यांची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रांत उन्नती घडवून आणण्यात मदत करणे.
उद्दिष्टे
- नियोजित कार्याच्या पूर्ततेसाठी मध्यवर्ती ठिकाणी कचेरीची स्थापना करणे.
- धार पवार घराण्यातील व्यक्तीना सभासद करून सुयोग्य सभासदास जबाबदारीचे वाटप करणे.
- सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन प्रतिष्ठानास राजकीय व्यासपीठ पासून दूर ठेवणे तथापि सभासदाना वैयक्तिक पातळीवर स्वातंत्र्य देणे.
- प्रतिष्ठानाचे सभासद व धार पवार समाजाचे मेळावे आयोजित करून त्यांच्या सुयोग्य मुला-मुलींचे विवाह घडवून आणण्यास मदत करणे.
- शैक्षणिक प्रगतीसाठी मार्गदर्शन शिबिरे- संमेलने आयोजित करून सभासदांना सर्वोतपरी मदत करणे.
- सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा पुढील पिढीला माहिती होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव, राज्याभिषेक दिन साजरा करणे यासाठी रथोत्सव इत्यादी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेणे.
- शेतकरी बांधवाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रशिक्षण प्रकल्प भेटी मार्गदर्शन आयोजित करणे.
- ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी गड किल्ले याठिकाणी सहली, भेटी आयोजित करणे.
- प्रतिष्ठानाच्या ध्येय-धोरणांना पोषकता येण्यासाठी “जाऊ तेथे एक भाऊ” याची पूर्तता करणे व भारताच्या राष्ट्रीय धोरणांस पुष्टी देण्यासाठी, आपल्या समाजास प्रतिष्ठा व मान्यता आणण्यासाठी प्रतिष्ठानास आर्थिक स्वायत्तता आणणे.
अतिरिक्त माहिती




नोंदणी
आमचा पत्ता
३०८ , गणेश पेठ, पुणे, महाराष्ट्र 411 001
फोन : ९८२२३४९७१२
फोन : ८०८७१००७७७
फोन : ९१७२५८५०४५
ईमेल : pawargharane@gmail.com
आमच्या लिंक
लोकप्रिय उपक्रम
-
२३ जानेवारी
-
१५ फेब्रुवारी