श्रीमंत धार पवार कुटुंब
आमची माहिती


माहिती
पवार घराणे फार पुर्वीपासून उच्चकुलीन आहे पवार घराण्याला वेदोक्तांचा अधिकार आहे . ब्रम्हेन्द्र स्वामींच्या पञातील उल्लेख पाहता कृष्णाजीराजे पवार विश्वासराव हे जातीने क्षञीय.तुम्हांस सुर्य, गायञी, आणि यज्ञोपायीत आहे .मराठा 96 कुळी याद्या प्रसिद्ध आहेत त्यात ही पवार त्यांचा वंश गोञ गादी निशाण व वेद याची माहिती खालीलप्रमाणे.... कुळाचे नाव पवार, वंश-अग्नीवंश, गादी धारगिरी गादी, निशाण लाल ध्वज त्यावर हनुमान, देवक-धार (शस्ञ), गोञ वशिष्ठ .
धोरण
विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ व विविध समित्यांची स्थापना करून समाज बांधवाना शासकीय व निम शासकीय संस्थाद्वारे योग्य मार्गदर्शन व सुयोग्य मदत मिळवून देवून त्यांच्या शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक प्रगतीस हातभार लावणे.
ध्येय
छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या, धार संस्थानाच्या गादीस प्रमुख समजत महाराष्ट्रांतील तमाम पवार (धार) बंधूना एकत्र आणून त्यांची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रांत उन्नती घडवून आणण्यात मदत करणे.
उद्दिष्टे
- नियोजित कार्याच्या पूर्ततेसाठी मध्यवर्ती ठिकाणी कचेरीची स्थापना करणे.
- धार पवार घराण्यातील व्यक्तीना सभासद करून सुयोग्य सभासदास जबाबदारीचे वाटप करणे.
- सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन प्रतिष्ठानास राजकीय व्यासपीठ पासून दूर ठेवणे तथापि सभासदाना वैयक्तिक पातळीवर स्वातंत्र्य देणे.
- प्रतिष्ठानाचे सभासद व धार पवार समाजाचे मेळावे आयोजित करून त्यांच्या सुयोग्य मुला-मुलींचे विवाह घडवून आणण्यास मदत करणे.
- शैक्षणिक प्रगतीसाठी मार्गदर्शन शिबिरे- संमेलने आयोजित करून सभासदांना सर्वोतपरी मदत करणे.
- सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा पुढील पिढीला माहिती होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव, राज्याभिषेक दिन साजरा करणे यासाठी रथोत्सव इत्यादी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेणे.
- शेतकरी बांधवाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रशिक्षण प्रकल्प भेटी मार्गदर्शन आयोजित करणे.
- ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी गड किल्ले याठिकाणी सहली, भेटी आयोजित करणे.
- प्रतिष्ठानाच्या ध्येय-धोरणांना पोषकता येण्यासाठी “जाऊ तेथे एक भाऊ” याची पूर्तता करणे व भारताच्या राष्ट्रीय धोरणांस पुष्टी देण्यासाठी, आपल्या समाजास प्रतिष्ठा व मान्यता आणण्यासाठी प्रतिष्ठानास आर्थिक स्वायत्तता आणणे.
विश्वस्त मंडळ

श्री सागरदादा पवार
-संस्थापक अध्यक्ष
श्री रितेशदादा पवार
-उपाध्यक्ष
श्री मनोहर दादा पवार
-उपाध्यक्ष
श्री शेखर दादा पवार
-कार्याध्यक्ष
श्री उमेशराव वैद्य (धार पवार )
-खजिनदार
श्री श्रीकांत दादा पवार
-सचिव
श्री डॉ. राजेंद्र सर पवार
-विश्वस्त
श्री ऍड. राहुलदादा पवार
-विश्वस्त
श्री निलेशराव पवार
-विश्वस्तमहाराष्ट्र समनव्यक

डॉ.सुभाष सर पवार
-समनव्यक
श्री सतीश उर्फ़ बाबाकाका पवार
-समनव्यक
श्री विजय पवार
-समनव्यक
श्री बाळासाहेब पवार (नगर)
-समनव्यक