उपक्रम
एका वेळी एक व्यक्तीस मदत करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसह प्रारंभ करा.

१४ जानेवारी मराठा शौर्यदिन
- द्वारा पवार घराणे |
- १४ जानेवारी |
- शुल्क मोफत |
- पुणे
संपूर्ण कार्यक्रम सुरवाती पासून संपेपर्यंत खूप उत्साह पूर्ण झाला. आज एक वेगळं नवचैतन्य घेऊनच प्रत्येक बांधव बाहेर पडला असेल, धार पवारच्या शौर्या ची गाथा नक्कीच प्रत्येकाच्या मनात कोरली गेली असेल. अंगात एक अचाट शक्ती निर्माण झाल्या सारखे वाटत असेल प्रत्येक बंधुला अभिवादना साठी दीप प्रज्वलित करीत असताना संपूर्ण मराठ्यांचा पानिपतचा इतिहास आठवत होता, माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा ऐहत्यासिक अशा लालमहल मध्ये अभिवादन म्हणजे त्या पानिपत वीरांना त्यांनी केलेल्या शौर्याचा सुवर्ण गौरवच म्हणावा लागेल. त्याच बरोबर आजच्या युगातील धारपवार कुटुंबातील डॉ.सुभाष सर पवार व कोमलताई पवार यांची अष्टधान्य तुला , सांगलीतील बांधवांना मदत हे आपल्या धारपवार कुटुंबाचे सामाजिक बांधलीकीचेच प्रतीक आहे यावेळी मा.श्री पांडुरंग काका बलकवडे,मा.श्री अभिजीत मरगळ, मा.श्री अमित गायकवाड, मा.श्री अनिल पवार या मान्यवरांनी मराठ्यांचा ज्वलंत इतिहास प्रेक्षकांसामोर मांडला. या वेळी कु.कार्तिकी सतीश पवार या भगिनी ने रेखाट्लेली महाराजा यशवंतराव पवार यांच्या तैल चित्राचे आनवरण कारण्यात् आले. आजच्या कार्यक्रम यशस्वी करण्यामागे सगळ्या बंधूनी घेतलेले परिश्रम हे पण उल्लेखनीय आहे, बाबा काकांचे नियोजन असेल, सागरदादांच रात्रीचा दिवस करणार काम असेल, रितेश दादांची धावपळ असेल, उमेश दादांची इतिहास सांगण्याची तळमळ असेल, शेखर दादांचे सूत्रसंचालन असेल, राहुल दादांच छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधने असेल आणि इतर मदतीसाठी सर्वच पवार बंधू असतील, सगळ्यानि खूप मन लावून काम केलं सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद