आदर्श व्यक्तिमत्व

एक संपूर्ण शांततेने माझ्या संपूर्ण आत्म्याचा ताबा घेतला आहे, ज्याप्रमाणे मी माझ्या संपूर्ण हृदयाने आनंद घेत आहे अशा वसंत ऋतूच्या सकाळी.
डॉ राजेंद्र पांडुरंग पवार Photo

डॉ राजेंद्र पांडुरंग पवार

एम.ए.,एम.फिल.,पीएचडी (पुणे विद्यापीठ) (जामगाव - अहमदनगर)

एम.ए.,एम.फिल.,पीएचडी (पुणे विद्यापीठ)माझा जन्म अहमदनगर जिल्हयातील जामगाव या पारनेर तालुक्यातील मामाचे गावी झाला. श्री बाळासाहेब भगत हे पारनेर तालुक्याचे तत्कालीन आमदार व पारनेर सहकारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते. माझे मुळ गाव नगर तालुक्यातील जेउर बायजाबाईचे. वडील प्राथमिक शिक्षक तर आजोबा शेती करायचे. आम्ही सहा भाउ व एक बहिण. थोरले बंधू जुन्या काळातील डिप्लोमा मॅकेनिकल. त्यांची सर्व्हीस बकावुल्फ कंपनी आताचा थ्रिसेन ग्रुप, पिंपरी येथे गेली. दोन नंबरचे बंधू गावी शेती करतात, तर मी तिन नंबरचा. माझे प्राथमिक व माध्यमीक शिक्षण गावीच झाले. 1979 साली 10 वी झालो. नंतर वडिल बंधू इंजिनिअर असल्याने त्यांनी मला देखील सायन्सला टेक्नीकलला टाकले. पण ते मला जमले नाही म्हणून मी 12 वी आर्टला ॲडमिशन घेवून न्यू आर्टस कॉमर्स व सायन्स कॉलेज, अहमदनगर येथे 1982 ला कॉलेजमध्ये पहिला क्रमांकाने उत्तिर्ण झालो. नंतर मात्र परत मागे पाहिले नाही. बी.ए. अर्थशास्त्र, एम.ए. अर्थशास्त्र पहिल्या वर्गाने पास झालो. 1988-89 साली पाच सहा महिने कॉलेजमध्ये लेक्चररशिप केली. पण मन शांत बसू देत नव्हते. त्यावेळी बालवाडीपासून ते 10 पर्यंत माझेबरोबर असलेले माझे चुलत बंधू हे 12 नंतर B.A.M.S. ॲडमिशन घेउन डॉक्टर झाले. या कालावधीतच मी दोन वेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा पास झालो होतो. पण मुलाखतीत गुण कमी मिळत गेल्याने अधिकारी होण्याचे मनातच राहून गेले. त्याच कालावधीत Zero Budget लागू केल्यामुळे शासकीय स्तरावरिल भरती बंद झाली होती. परिणामी स्वप्न स्वप्नच राहते की काय अशी भिती मनाला लागून राहिली होती.एम.ए. पूर्ण केल्यानंतर एम.फील. करणेसाठी मी मराठवाडा विदयापीठात ॲडमिशन घेतले. याच कालावधीत अहमदनगर येथे लॉ करत असताना अहदनगर जिल्हा परिषदेत नव्यानेच रुजु झालेले एक अधिकारी माझे बरोबर प्रथम वर्ष लॉ करत होते. आमची चांगली मैत्री झाली होती. सन 1989 साली महाराष्ट्र विकास प्रशासन प्रबोधिनी (मिडा ) म्हणजेच आताची यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे यांचे एका जिल्हा नियोजन प्रकल्पासाठी संशोधन सहाययक पदासाठी मुलाखतीस बोलावणे आले. मी आमचे जिल्हा परिषदेतील मित्रास याबाबत विचारले, त्याने सांगीतले की, तु संधी सोडू नकोस तु जा कारण मी एमपीएससी नंतर निवड झालेवर प्रशिक्षणाला त्याच संस्थेत होतो. मोठमोठे अधिकारी यांचा सहवास लाभतो. वडिल जाउ नको म्हणत असताना मी मुलाखतीला आलो व 50 उमेद्वारातून दोन जनांची निवड झाली होती त्यात मी एक होतो. निकाल लगेचच सांगीतला पगार त्यावेळी करारतत्वावर असल्याने रुपये 1500/- महिना होता. वडिल बंधू पुण्यालाच नोकरीला असल्याने राहण्याचा प्रश्न नव्हता. ते पिंपरीला मासुळकर कॉलनीत रहात होते. ऑफीसची वेळ सकाळी 9.30 ते 5.15 अशी होती. मला सकाळीच 7.00 चे बसने यावे लागायचे. वाकडेवाडीला उतरुन म्हसोबा गेटपर्यंत पायी चालत यायचे व तेथून दुसरी बस पकडून विदयापीठ गेट गाठायचे असे जवळपास 3 ते 4 वर्षे करावे लागले. पहिल्यांदा नविन असताना तर पुण्याची जास्त माहिती नव्हती मगं कधी कधी बस चुकली तर वाकडेवाडी ते पुणे विदयापीठ पायी चालत जावे लागायचे.नोकरी करत असतानाच मला पुणे विदयापीठात Ph.D. ला प्रवेश मिळाला.

मी पीएच.डी चा अभ्यास सुरु केला, माझे गाईड फर्ग्युसन महाविदयालयात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते तसेच ते पुणे विदयापीठात देखील मेंटल ॲन्ड मोरल विभागाचे Dean म्हणून काम करत होते. त्यावेळचा माझा दिनक्रम सकाळी 7.00 वाजता पिंपरीहून वाकडेवाडीला उतरायचे तेथून चालत म्हसोबा गेटपर्यंत जायचे व तेथून यशदा येथे कार्यालयात काम करायचे. सायंकाळी 5.30 वाजता ऑफीस सुटले की यशदाहून चालत चर्तुश्रृंगी मार्गे फर्ग्युसन कॉलजला साधारणत 6.30 पर्यंत पोचायचे. नंतर 7 ते 10 पर्यंत पीएच.डी. अनुषंगाने काम करायचे व 10.30 वाजता फर्ग्यूसन कॉलेज ते वाकडेवाडी पायी चालत जावून संध्याकाळची 11.15 वाजताची बस पकडून पिंपरीला जायचे असे जवळपास 3 ते 4 चालले. संध्याकाळचे जेवण रात्री 12.00 वाजता करायचे या कालावधीतच लग्न झालेले होते (1992) मगं पत्निला पीएच.डी. कामाचे नियोजन सांगून झोपायचे. परत दुसरे दिवशी सकाळी 7.30 वाजता परत ऑफीसला जायचे. अगदी कंटाळा यायचा, नको वाटायचे. पण मग चुलत बंधू व त्यांचे डॉक्टर हे शब्द समोर नाचायला लागायचे. परत मगं जोमाने कामाला सुरुवात करायचो. शेवटी 1997 साली पुणे विदयापीठाची अर्थशास्त्र विषयाची Ph.D. पदवी मला अवॉर्ड झाली, तीही 31 व्या वर्षी. इतक्या कमी वयात Ph.D. मिळवणारा त्याकाळी कदाचीत मी पहिलाच असेल. आज आमचे चुलत बंधूही डॉक्टर आहेत ते शरिराचे व मीही डॉक्टर आहे अर्थाचा. त्यावेळी ऑफीसमधली लोक मला वेडा झालेला आहे असे म्हणायची. त्यांचे बरोबरच होते म्हणां एक गावाकडचा गावंढळ विदयार्थी ज्याला साधे इंग्रजीही बोलता येत नव्हते तो पुण्यात येवून Ph.D कसा काय होवू शकेल असा तत्कालीनांचा सवाल असायचा. सन 2003 साली माझी वर्ग-1 श्रेणीत मुलाखतीद्वारे निवड झाली. मगं एक एक सिडी चढत चढत मी आज यशदातील एका विभागाचा संचालक म्हणून काम करत आहे. ज्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परिक्षा देवून अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते तेथेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या वर्ग-1 च्या अधिका-यांना मी आज प्रशिक्षण देत आहे, त्यांना घडवत आहे. मागे वळून पाहताना आताच्या आनंदामुळे यापूर्वी घेतलेले कष्ट, झालेला त्रास, मित्र मैत्रणींनी माझेवर केलेले कॉमेंटस, लहानपणी शाळेत असताना चिमणीच्या प्रकाशात केलेला अभ्यास, कधी देवळात तर कधी जुगारी, दारुडे, गंजाडी लोकांमध्ये तर कधी खेळाचे मैदानात बसून केलेला अभ्यास मला आज कुठेच्या कुठे घेवून आला याचे आश्चर्य व अभिमानही वाटतो तो माझेवर आई वडिलांनी केलेल्या शिक्षणांचे संस्काराचा, अभिमान वाटतो माझे कुळाचा व माझे आजोबांचा जे स्वत: शेती करत व आम्हा नातवंडाना कधी शेतीची कामे करु न देता शाळेकडे लक्ष दया असे सांगणा-या अशिक्षीत अडाणी पण काळाची पावले ओळखणा-या त्या संस्काराचे विदयापीठातील संस्काररुपी आदर्शांचा.

आज यशदामध्ये काम करत असताना 1989 ते आजपर्यंतच्या प्रवासात विविध विषयांवर मी प्रशिक्षण घेतली जसे की, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, प्रशिक्षणाचे डिझाईन, प्रशिक्षणाचे मूल्यमापन, संनियंत्रण इत्यादी. रॉबर्ट चेंबर यांचे हाताखाली 15 दिवसांचा Participatory Rural Appraisal (ग्रामीण सहभागी समिक्षण) हा इतर देशातील सहभागी प्रशिक्षणार्थींबरोबर 2005 साली करता आला. बांगला देशातील CIRDAP, ढाका यां संस्थेमार्फत आशिया खंडातील विविध देशातील अधिका-यांसाठी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात 15 दिवस सहभागी होता आले. मी खालील संस्थांचा सभासद आहे -International Input-Output AssociationLife member of “Marathi Arthashtra Parishad”Member of Arthasanwad MasikMember of Vasundhara State level Nodal AgencyState Level NGO Federationआतापर्यंत जवळपास 2000 चे पुढे वेगवेगळया विषयांवर व्याख्याने दिली आहेत. जसे की, पाणलोट क्षेत्र विकास, जलसंधारण, सहभागी नियोजन, संदेशवहन कौशल्ये, संशोधन पध्दती, प्रकल्पा तयारी व व्यवस्थापन, शेळ प्रकल्पाचे अर्थशास्त्र, डाळींब पिकाचे अर्थशास्त्र, सहभागी ग्रामीण समिक्षण, गाव नियोजन व गावचा विकास, आदर्शगाव इत्यादी.खालील संशोधन प्रकल्प पूर्ण केले-EGS linked with Horticulture programme- Impact Study-1992District Perspective Plan- 1989-92Impact of Watershed Management on the Village Development- A Case Study of Hiware Bazar- 1995National Study on SGSY: A Progress Study 2005-06Evaluation of Grampanchayat Training Programme in 14 districts of MaharashtraProperty Tax Assessment- PCMC 2004Mother NGO Report- Participation of NGOs in Hariyali Watershed Programme-2005National Study on Participatory Approach to Rural Development Maharashtra State, NIRD-2006Study Group Report on “New Common Guidelines 2008- Watershed-2008Methodology for Appointment of Appropriate Personnel at “Vasundhara & District level”Systematic Evaluation of Watershed Project under IWDP & DPAP- Sindhudurg, Osmanabad & Satara district-2009Mid-term Evaluation of Development of Waterlogged & saline lands through subsurface drainage-TDE & TS pilot project Digraj, Sangli