पवार घराणे

श्रीमंत धार पवार कुटुंब

आमची माहिती

आपण सर्व धार पवार कुटुंबीय एका वंशाच्या धाग्याने बांधले गेलो आहोत. आपल्या घराण्याला फार प्राचीन परंपरा लाभली आहे. सिकंदराच्या आक्रमणाला पहिल्यांदा सामोरे जाणारा आणि त्याला या भूभागात घुसू न देणारा राजा पौरस पण पवार वंशीयच. त्याप्रमाणे सम्राट विक्रमादित्य, महाराजा भोज यांसारखे पराक्रमी सम्राट, नवनाथांपैकी एक असलेले राजा भर्तृहरीनाथ यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा वारसा लाभलेले पवार किंवा परमार घराणे.

इतिहासात डोकावताना वास्तवाच पण भान बाळगणे आवश्यक असते. आपल्या पवार कुटुंबियांना शिवजयंती रथ उत्सवानिमित्ताने एकत्र आणणे, एकमेकाबद्दल माहिती करून घेणे, आपसात संबंध वृद्धींगत करणे, शक्य झाल्यास एकमेकांना मदत करणे, समाज उपयोगी काम करणे आणि किमान आपल्या भावी पिढीला आपल्या दैदिप्यमान इतिहासाची जाणीव करून देणे हा या कार्याचा उद्देश आहे.


धोरण

विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ व विविध समित्यांची स्थापना करून समाज बांधवाना शासकीय व निम शासकीय संस्थाद्वारे योग्य मार्गदर्शन व सुयोग्य मदत मिळवून देवून त्यांच्या शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक प्रगतीस हातभार लावणे.

ध्येय

छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या, धार संस्थानाच्या गादीस प्रमुख समजत महाराष्ट्रांतील तमाम पवार (धार) घराण्यांना एकत्र आणून त्यांची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रांत उन्नती घडवून आणण्यात मदत करणे.

उद्दिष्टे

  • नियोजित कार्याच्या पूर्ततेसाठी मध्यवर्ती ठिकाणी कचेरीची स्थापना करणे.
  • धार पवार घराण्यातील व्यक्तीना सभासद करून सुयोग्य सभासदास जबाबदारीचे वाटप करणे.
  • सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन प्रतिष्ठानास राजकीय, धार्मिक व्यासपीठ पासून दूर ठेवणे तथापि सभासदाना वैयक्तिक पातळीवर स्वातंत्र्य देणे.
  • प्रतिष्ठानाचे सभासद व धार पवार समाजाचे मेळावे आयोजित करून त्यांच्या सुयोग्य मुला-मुलींचे विवाह घडवून आणण्यास मदत करणे.
  • शैक्षणिक प्रगतीसाठी मार्गदर्शन शिबिरे- संमेलने आयोजित करून सभासदांना सर्वोतपरी मदत करणे.
  • सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा पुढील पिढीला माहिती होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव, राज्याभिषेक दिन साजरा करणे यासाठी रथोत्सव इत्यादी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेणे.
  • ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी गड किल्ले याठिकाणी सहली, भेटी आयोजित करणे.
  • प्रतिष्ठानाच्या ध्येय-धोरणांना पोषकता येण्यासाठी “जाऊ तेथे एक भाऊ” याची पूर्तता करणे व भारताच्या राष्ट्रीय धोरणांस पुष्टी देण्यासाठी, आपल्या समाजास प्रतिष्ठा व मान्यता आणण्यासाठी प्रतिष्ठानास आर्थिक स्वायत्तता आणणे.

विश्वस्त मंडळ

Member Photo
श्री सागरदादा पवार

- संस्थापक अध्यक्ष

Member Photo
श्री रितेशदादा पवार

- उपाध्यक्ष

Member Photo
श्री मनोहर दादा पवार

- उपाध्यक्ष

Member Photo
श्री शेखर दादा पवार

- कार्याध्यक्ष

Member Photo
श्री उमेशराव वैद्य (धार पवार )

- खजिनदार

Member Photo
श्री श्रीकांत दादा पवार

- सचिव

Member Photo
श्री डॉ. राजेंद्र सर पवार

- विश्वस्त

Member Photo
श्री ऍड. राहुलदादा पवार

- विश्वस्त

Member Photo
श्री निलेशराव पवार

- विश्वस्त

महाराष्ट्र समनव्यक

Member Photo
डॉ.सुभाष सर पवार

- समनव्यक

Member Photo
श्री सतीश उर्फ़ बाबाकाका पवार

- समनव्यक

Member Photo
श्री विजय पवार

- समनव्यक

Member Photo
श्री बाळासाहेब पवार (नगर)

- समनव्यक

Member Photo
श्री वैभवराव पवार

- समनव्यक

आमचा पत्ता

३०८ , गणेश पेठ, पुणे, महाराष्ट्र 411 001

फोन : ९८२२३४९७१२

फोन : ८०८७१००७७७

फोन : ९१७२५८५०४५

ईमेल : pawargharane@gmail.com

लोकप्रिय उपक्रम