उपक्रम
-
वेब साईट अनावरण
दि २७ ०१ २०१९ रविवार रोजी *श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान* चे अधिकृत वेबसाईट www.dharpawar.com चे उदघाटन प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक *डॉ जयसिंह पवार सर* यांच्या हस्ते कोल्हापुर येथे पार पडले. या वेबसाईट वर आपल्याला संपूर्ण पवार घराणे चा इतिहास पाहता येईल तसेच धार पवार एकत्र करण्याचा आपला जो उपक्रम आहे त्यात आपली मोफत नोंदणी करता येईल. आपल्या पवार घराण्यातील सामजिक कार्यात अग्रेसर असणारे पवार बंधू चे समाजातील योगदान पहाता येईल. तसेच विवाह शिक्षण रोजगार या वर हि वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या पवार बंधूंना मदत होईल. सर्व धार पवार बंधूंना विनंती आहे की आपण www.dharpawar.com या वर आपला फॉर्म भरून आपली नोंद करावी..
-
१४ जानेवारी मराठा शौर्यदिन
संपूर्ण कार्यक्रम सुरवाती पासून संपेपर्यंत खूप उत्साह पूर्ण झाला. आज एक वेगळं नवचैतन्य घेऊनच प्रत्येक बांधव बाहेर पडला असेल, धार पवारच्या शौर्या ची गाथा नक्कीच प्रत्येकाच्या मनात कोरली गेली असेल. अंगात एक अचाट शक्ती निर्माण झाल्या सारखे वाटत असेल प्रत्येक बंधुला अभिवादना साठी दीप प्रज्वलित करीत असताना संपूर्ण मराठ्यांचा पानिपतचा इतिहास आठवत होता, माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा ऐहत्यासिक अशा लालमहल मध्ये अभिवादन म्हणजे त्या पानिपत वीरांना त्यांनी केलेल्या शौर्याचा सुवर्ण गौरवच म्हणावा लागेल. त्याच बरोबर आजच्या युगातील धारपवार कुटुंबातील डॉ.सुभाष सर पवार व कोमलताई पवार यांची अष्टधान्य तुला , सांगलीतील बांधवांना मदत हे आपल्या धारपवार कुटुंबाचे सामाजिक बांधलीकीचेच प्रतीक आहे यावेळी मा.श्री पांडुरंग काका बलकवडे,मा.श्री अभिजीत मरगळ, मा.श्री अमित गायकवाड, मा.श्री अनिल पवार या मान्यवरांनी मराठ्यांचा ज्वलंत इतिहास प्रेक्षकांसामोर मांडला. या वेळी कु.कार्तिकी सतीश पवार या भगिनी ने रेखाट्लेली महाराजा यशवंतराव पवार यांच्या तैल चित्राचे आनवरण कारण्यात् आले. आजच्या कार्यक्रम यशस्वी करण्यामागे सगळ्या बंधूनी घेतलेले परिश्रम हे पण उल्लेखनीय आहे, बाबा काकांचे नियोजन असेल, सागरदादांच रात्रीचा दिवस करणार काम असेल, रितेश दादांची धावपळ असेल, उमेश दादांची इतिहास सांगण्याची तळमळ असेल, शेखर दादांचे सूत्रसंचालन असेल, राहुल दादांच छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधने असेल आणि इतर मदतीसाठी सर्वच पवार बंधू असतील, सगळ्यानि खूप मन लावून काम केलं सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद
-
श्रीमंत राजे पवार घराणे सामजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र संघटने विषयी माहिती
जेष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ जयसिंगराव पवार सर यांना श्रीमंत राजे पवार घराणे सामजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र संघटने विषयी माहिती देताना संस्थापक अध्यक्ष श्री सागरदादा पवार,श्री उमेश वैद्य पवार (धार पवार इतिहास अभ्यासक ), श्री सतीश पवार - बाबा काका.
-
श्रीमंत पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठन तर्फे मदत निधी
श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून श्री. भगवान दामू पवार रा. सौंदने ता. मालेगाव रुपये 12000 चेक देण्यात आला,काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात गॅस स्फोट झाला होता, त्यांना अल्पशी मदत म्हणून प्रतिष्ठा चे मार्फत चेक देण्यात आला, सदर चेक देताना खानदेश संघटक शिवाजीदादा पवार श्री, आशुतोष दादा पवार, श्री. भरत दादा पवार, श्री विजय पवार, श्री भगवान पवार व त्यांचे सर्व बंधू व पुतणे हजर होते, आपल्या बांधवाना त्यांच्या कुटुंबियांना मदत करणे हे संघटनेचे ध्येय आहे
-
पानीपतवीर शहीद श्रीमंत महाराजा राजे यशवंतराव पवार इतर सरदार व तमाम मराठा वीरांना श्रद्धांजली कवठे व मलठण येथील राजे यशवंतराव पवार यांच्या गढीवर
आज दि १४ ०१ २०१९ राजी श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान मार्फत पानीपत वर कामी आलेल्या श्रीमंत महाराजा राजे यशवंतराव पवार नरसोजी पवार धर्माजी पवार कर्णानी पवार बिंबाजी पवार आप्पाजी पवार दत्ताजी पवार अनोजी पवार व पानीपत वर लढलेल्या तमाम मराठा वीरांना श्रद्धांजली कवठे येथील राजे यशवंतराव पवार यांच्या गढीवर आयोजित केली होता. संग्रामसिंह काका साहेब पवार यांच्या मार्गदर्शनखाली आजचा कार्यक्रम पार पडला. श्रद्धांजली अर्पण करण्यास उदयसिंह काका पवार (संस्थान मलठण) जयदीपसिंहकाका पवार(संस्थान मलठन) श्रीमंत रोहित राजे देशमुख पवार राजकुमार महाराज ऑफ सुरगाणा (सुरगणा) हर्षजितराजे पवार (संस्थान नगरदेवळा) धनजयसिंह सोरटे-पवार व विठ्ठल दादा पवार(नगरसेवक शिरूर) हे उपस्थित होते. उदय सिंह काका व जयदिपसिंह काका यांनी दोन्ही वाड्यावर सगळ्या पवार बंधूंच अगत्य स्वागत केले त्या बद्दल समस्त पवार बंधू ऋणी आहोत..
-
श्रीमंत पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठन तर्फे मदत निधी
बलिदान भुमी तुळापुर येथे शंभुराजांच्या सिनेमागृह व वस्तु संग्रालयाच्या ऐतिहासिक बांधकामास आपल्या *श्रींमत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र* कडून संस्थापक अध्यक्ष श्री सागर दादा पवार यांच्या हस्ते *५०००₹ चेक* *अध्यक्ष धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पालखी सोहळा समिती यांना देण्यात आला. या प्रसंगी *प्रतिष्ठानचे समन्वयक बाबा काका पवार आणी वैभव दादा पवार* उपस्थित होते 🚩*जय शिवराय* *जय शंभूराजे*🚩
-
रथ उत्सव
आज आपल्या श्रीमंत धार पवार घराणे रथ उत्सव निमंत्रण साठी हेमेन्द्रसिंह महाराज यांची धार च्या राजवाड्यात भेट घेतली. महाराजांनी तब्बल 4 तास वेळ दिला. चर्चा झाली. महाराज सपत्नीक उपस्थित राहणार आहेत. महाराजांनी धार उत्सव साठी एक धार स्टेटची दुर्मिळ स्टील फ्रेम भेट दिली. फ्रेम स्वीकारताना रितेश दादा पवार, उमेश दादा वैद्य, बाबाकाका पवार, सागरदादा पवार श्रीमंत महाराजा हेमेन्द्रसिंह पवार व महाराणी साहेब...
-
दैदिप्यमान इतिहास शिवस्मारक
आज मुंबई येथे श्रीमंत राजे पवार घराणे तर्फे धार पवार यांचा दैदिप्यमान इतिहास शिवस्मारक येथे मांडण्यात येणाऱ्या सरदार घराण्यात सांक्षिप्त स्वरूपात मंडण्यात यावा या साठी श्रीमंत राजे पवार घराणे सामजिक प्रतिष्ठान तर्फे सागर दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक समितीचे अध्यक्ष मा.आ. विनायकराव मेटे साहेब यांना देण्यात आले.
-
स्नेह मेळावा
आज धैर्यशीलराजे पवार संस्थान नगरदेवळे व श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष सागरदादा पवार यांच्या अध्यक्षते खाली खान्देश विभाग पवार घराणे स्नेह मेळावा यशस्वी पार पडला. शिवाजी दादा पवार चाळीसगाव यांच्या अथक प्रयत्नातू हा कार्यक्रम पार पडला...
-
रथ उत्सव
महाराजा श्रीमंत हेमन्द्रसिंह पवार यांना. श्रीमंत राजे पवार घराणे आयोजित रथ उत्सव साठी धार येथे निमंत्रण देताना. मा सागरदादा पवार, बाबाकाका पवार,रितेश दादा पवार व उमेशदादा वैद्य..
-
पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठन तर्फे बैठक
आज दि १५ ०७ २०१८ रोजी शुक्रवार पेठ पुणे येथे श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठन तर्फे आज बैठक झाली. संपूर्ण महाराष्ट्र्र मधील पवार बंधु आज उपस्थित होते. महाराष्ट्र मध्ये जिल्हा, तालुका, शहर निहाय पवार बंधूंची संघटनात्मक निवड करण्यासाठी एकमताने ठराव करण्यात आला.
-
राजे यशवंत पवार स्मुर्ती दिन
१४ जानेवारी २०१७ राजे यशवंतराव पवार स्मृती दिन श्रीमंत धार पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. सागर दादा पवार यांच्या अध्यक्षते खाली मा. संग्राम सिंग पवार , संग्राम काकासाहेब पवार (ग्रुप) मा. डॉ. सुभाष सर पवार मा .दत्ताजीराव पवार या मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.
-
श्रीमंत पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठन तर्फे बैठक
श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठन तर्फे आज अहमदनगर येथे बैठक झाली. संपूर्ण नगर जिल्ह्यातील पवार बंधु आज उपस्थित होते.
-
मराठा आरक्षणसाठी मागासवर्गीय आयोगास निवेदन देताना
मराठा आरक्षण सुनावणी आयोगा समोर पुणे येथे आपल्या संघटने मार्फत महाराष्ट्रातील धार पवार बंधूचे आर्थिक व सामाजिक वस्तुथिती व आरक्षण गरज याबाबत आयोगास निवेदन दिले
-