चिंतन – करियरचे ......
१० वी -१२ वी चा निकाल लागला- आनंद ... एक दिव्य पार केल्याचे समाधान फार दिवस ठिकत नाही पुढील प्रवेशाचे वादळ प्रत्येक विध्यार्थी व पालकांच्या मनात घोंगावत असते .काहींनी आधीच निश्चित केले असते की कुठल्या शाखेत व कुठे प्रवेश घ्यायचा त्या सर्वांचे निश्चित कौतुक आहे . क्रिकेट मॅच चे कसे खेळपट्टी व पहिल्या इंनिग चा स्कोअर बघून पुढील नियोजन करतात तसे काही पालकांचे निकाल लागल्यावर प्रवेशाची तयारी करतात.१० वी /१२ वी मार्क्स-मूल्यमापन ही मुलांची पात्रता असे होऊ शकत नाही शालेय गुणवत्ता व्यतिरिक्त इतर कौशल्य मुलांमध्ये असतात त्याचा अभ्यास असावा आणि त्या कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम याचाही विचार व्हावा.परंपरेनुसार शिक्षण फक्त अर्थाजन चे प्रवेशद्वार याच दृष्टीने सर्वजण विचार करतो , पालक म्हणतात बोलायला सोपे आहे हो जगण्यासाठी पैसा लागतो ...बाहेर होणाऱ्या आत्महत्या ( करणाऱ्या व्यक्ती ) , तणावपूर्ण आयुष्य , लग्नानंतर २ वर्षात होणारे घटस्पोठ , कमी वयात येणारे आजार यांचा विचार केला तर व्यक्तीची जीवन शैली ( करियर ) हा ही महत्वाचा घटक आहे .
स्वतच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नको त्या दिशेने प्रयत्न होतो शेवटी नैराश्य पण वेळ निघून गेलेली असते खरतर १० वी / १२वी नंतर योग्य शाखेला / योग्य शिक्षण संस्थेत प्रवेश प्रत्येक मुलाच्या पुढील आयुष्याच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा आहे . अर्थात त्यासाठी खूप गडबडून जाण्याची गरज नाही गरज आहे योग्य दिशेने विचार करण्याची व योग्य मार्गदर्शन घेवून स्वत कुटुंबीय सोबत चर्चा करून निर्णय घेण्याची . सध्य घडीला इंजिनिअरींग , लोकसेवा आयोग व मेडिकल या शाखांना अवास्तव महत्व दिले गेले आहे याव्यतिरिक्त इतर अनेक चांगले पर्याय आहे याकडे लक्षच दिले जात नाही .सर्व साधारणपणे सोपे , समोर उपलब्ध आणि घराच्या जवळ ( हा नवा विचार आहे ) अशाच पर्यायांचा विचार होतो आणि त्याच दिशेने चाचपणी होते –हे योग्यच आहे पण सर्वच चांगले इंजिनिअर , डॉक्टर व अधिकारी नाही होऊ शकत –नाउमेद होण्याची गरज नाही मुद्धा इतकाच इतर पर्याय – मुलाचे कौशल्य व शाखांचा विचार व्हायला हवा . शहरात ( आजकल तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा ) निकाल लागला रे लागला की विविध कॉलेज , क्लासेस च्या जाहिराती सर्वच माध्यमातून बघायला मिळतात एखादी वस्तू खरेदी करतांना जसा विचार होतो कुटली चांगली , किती किमत , काय सुविधा ( accessories ) , किमत (पगार ) कमी अधिक अशाच व्यावहारिक घटकांचा विचार करून करिअर चा विचार करतो परत तेच हे चुकीच नाही- गरज आहे अजून व्यापक विचारांची –चिंतनाची. पुढे जाऊन १०वि / १२ वी चे मार्क्स , डिग्री , कॉलेज या व्यतिरिक मुलामध्ये असणारे / निर्माण झालेली कौशल्य महत्वाची आहेत त्यावर पुढील प्रगती अवलंबून असते.
१० वी / १२वी चे मार्क्स यावर आधारित प्रवेश प्रक्रिया असतात शेवटी काहीतरी पात्रता निकष ठेवायला लागतील पण फक्त मार्क्स व शिक्षण पूर्ण करून मिळणारा पगार असा एकांगी विचार नको ...मुलांचा कल , विषयाची आवड , पुढे उपलब्ध होणाऱ्या नोकरी व्यतिरिक्त व्यवसाय च्या संधी ( आपली शिक्षण पद्धत नोकर घडवते पण उद्योजक नाही ) , पालकाची आर्थिक परिस्थिती या आणि अशा अनेक मुद्याचा विचार व्हावा . काही वेळा पालक मुलांच्या मताप्रमाणे प्रवेश घेतात अशा वेळी पालकांनी सुद्धा डोळसपणे निर्णयाची खात्री करून सर्व बारकावे मुलांना प्रश्न विचारून तपासले पाहिजेत . शिकतात मुले आपोआप , कळेल त्याला नंतर , आपण थोडे जास्त लक्ष देवू, क्लास लावू अशा भ्रामक कल्पना वर आधारित प्रवेश नको .... आई – बाबा पालक यांचेही एकमत असणे गरजेचे आहे बऱ्याच वेळा बाबा पालक आपल्या संपर्कानुसार माहिती काढतात , आई पालक त्यांच्या कुवतीनुसार माहिती काढतात आणि मुलगा तिसराच विचार करतो . बाहेरून मिळणाऱ्या माहितीचा वापर निर्णय घेण्यासाठी करावा शेवटी सर्वांच्या सहमतीने निर्णय घ्यावा नाहीतर चुकून अपयश आले तर घरात तणाव निर्माण होतात व अपयशात योग्य विचार करण्या ऐवजी मुलांना आणि पालकांना ही वेगळेच टेन्शन असतें.
आपल्या मुलामध्ये काय कौशल्य आहेत हे बाहेरचे नाही सांगू शकत जन्मापासून ज्याला आपण घडवलं त्याचे गुणदोष हे पालक व स्वत विध्यार्थी हेच चांगले अवलोकन करू शकतात म्हणून करियरचा निर्णय पालकांनी स्वत सारासार विचार करून घ्यावा.
आपली टिप्पणी जोडा