श्रीमंत धार पवार कुटुंब
आपण सर्व पवार कुटुंबीय एका वंशाच्या धाग्याने बांधले गेलो आहोत. आपल्या घराण्याला फार प्राचीन परंपरा लाभली आहे. सिकंदराच्या आक्रमणाला पहिल्यांदा सामोरे जाणारा आणि त्याला या भूभागात घुसू न देणारा राजा पौरस पण पवार वंशीयच. त्याप्रमाणे सम्राट विक्रमादित्य, महाराजा भोज यांसारखे पराक्रमी सम्राट, नवनाथांपैकी एक असलेले राजा भर्तृहरीनाथ यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा वारसा लाभलेले पवार किंवा परमार घराणे.